यावल प्रतिनिधी । तालुक्यातील अंजाळे गाव शिवारातून अज्ञात चोरट्यांनी एका शेतकऱ्याच्या खळयातुन बैलजोडी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत अज्ञात बैल चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात यावल पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की, अंजाळे ता.यावल येथिल राजेश बळीराम पाटील (वय-५५) यांच्या अंजाळे गाव शिवारातील खळयातुन १७ मेच्या रात्री ८ वाजेपासुन तर दिनांक १८ मे च्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरटयांनी त्यांच्या खळवाळीत बांधलेले ५५ हजार रुपये कींमतीची बैलजोडी चोरून नेली. असुन या बाबत राजेश बळीराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयांविरूद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. नागपाल भास्कर करीत आहे.