अंजाळे येथून खळ्यात बांधलेली बैलजोडी चोरली : पोलिसात गुन्हा दाखल

यावल,  प्रतिनिधी  । तालुक्यातील अंजाळे गाव शिवारातील एका शेतकऱ्याच्या खळयातुन अज्ञात चोरट्यांनी बैलजोडी चोरून नेल्याची घटना घडली असून , यावल पोलीसात याबाबत  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती की,   दि.  ३ ते ४ सप्टेंबर २०२१ रोजी रात्रीच्या ९ ते १२ वाजेच्या सुमारास अंजाळे गावातील राहणारे प्रकाश अमृत पाटील यांच्या खळयातील बांधलेले ३० हजार रुपये किमतीचे दोन बैल  मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरटयांनी चोरून नेली आहेत. चोरट्यांनी खळयात बांधलेले लाल भुरकट रंगाचे गावरान जातीचे प्रत्येकी १५ हजार रुपये किमतीचे दोन बैलांची जोडी ही चोरून नेल्याची घटना घडली आहे. , प्रकाश अमृत पाटील हे खळयातीत खुल्या जागेच्या ठिकाणी बाजुस बांधलेल्या खोलीत झोपले असता ते रात्री १२ वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी झोपेतुन उठले असता अज्ञात चोरटयांनी खोलीचा दरवाजा बाहेरून कडी लावल्याचे आढळून आले.  प्रकाश पाटील यांनी खोलीच्या खिडकीतुन बाहेर पाहीले असता , खळयातील खुल्या जागेत बांधलेले बैल दिसून  आले नाही. याबाबत प्रकाश अमृत पाटील यांनी यावल पोलीसात फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस निरिक्षक पाटील यांच्या आदेशाने पोलीस अमलदार अशोक प्रल्हाद जवरे हे करीत आहे . दरम्यान मागील काही दिवसांपासून यावल व परिसरातुन पशुधनसह मोबाइल लांबविणे व इतर चोरीचे प्रमाणात वाढ झालेली असुन पोलीसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरीकांकडुन होत आहे.

 

Protected Content