जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात प्रवासी अंगणवाडी महिलेची ५० हजारांची मंगल पोत लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार 8 फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेली माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे सुनिता राजेंद्र सोनार (वय-४९) या वास्तव्यास आहेत. त्या अंगणवाडी सेविका असून कामानिमित्ताने बुधवारी जळगावात आल्या होत्या. काम आटोपून झाल्यावर त्या घरी जाण्यासाठी दुपारी ४ वाजेच्या सुमारास नवीन बसस्थानकात आल्या. बसमध्ये बसताना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २३ ग्रॅम वजनाची ५० हजार रुपये किमतीची सोन्याची मंगल पोत लांबवली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सुनिता सोनार यांनी तक्रारीसाठी जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठले. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे करीत आहेत.