हॉटेलमध्ये बसण्याच्या कारणावरून हॉटेल व्यवसायिकाला दोन जणांकडून बेदम मारहाण

जळगाव शहरातील रामानंदनगर भागात गिरणा पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या एका हॉटेल जवळ हॉटेलमध्ये बसण्याचे कारणावरून हॉटेल व्यवसायिकाला शिवीगाळ करून मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या संदर्भात शुक्रवारी १९ मे रोजी रात्री १० वाजता २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, कीरन रमेश अहिरे ,(वय-३२, रा. रायसोनी नगर) यांचे रामानंदनगर भागात असलेल्या गिरणा पाण्याची टाकीजवळ हॉटेल आहे. या ठिकाणी १८ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास दत्तू कोळी आणि त्याच्यासोबत इतर दोन ते तीन जण यांनी येऊन हुल्लडबाजी केली. यामध्ये हॉटेल मालक किरण अहिरे याला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली तसेच हॉटेलवर दगडफेक केली. यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून दहशत निर्माण केली. याप्रकरणी हॉटेल मालक किरण अहिरे यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दत्तकडी यांच्यासह इतर दोन ते तीन जणांना विरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील करत आहे.

Protected Content