सुरेखा पुणेकरांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी : बीआरएसमध्ये प्रवेश !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ख्यातनाम लावणी कलावंत सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम करत बीआरएस या पक्षात प्रवेश केला आहे.

 

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी हैद्राबादच्या बीआरएस पार्टीत प्रवेश केलाय. तेलंगणाचे मुख्ममंत्री के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर यांनी काल भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.राव यांच्या उपस्थितीत सुरेखा यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशाआधी सुरेखा पुणेकर या दोन दिवसांआधीच हैद्राबादमध्ये त्यांनी राव यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी या पक्षात प्रवेश घेतला आहे.

 

सुरेखा पुणेकर यांना विधानसभा निवडणूका लढवायची ईच्छा असल्याचे त्यांनी सांगितले. मोहोळ किंवा देगूलूरमधून बीआरएसच्या तिकिटावर सुरेखा पुणेकर लढण्याची शक्यता आहे. सुरेखा या बिग बॉस मराठी २ मध्ये सहभागी झाल्या होत्या. याआधी त्यांनी मोहोळ मतदारसंघातून चाचपणी केली होती. तथापि, तेव्हा काही जमून आले नव्हते. मात्र पुढील वर्षी होणार्‍या निवडणुकीत त्या निश्‍चीतपणे उतरणार असल्याचे आता मानले जात आहे.

Protected Content