शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीतून ईलेक्ट्रीक मोटारीसह केबल वायरची चोरी

धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील सोनवद खुर्द शिवारातील शेतातील विहिरीतून १० हजार रुपये किमतीची जलपरी इलेक्ट्रिक मोटर आणि केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात सोमवार २० मार्च रोजी ५ पाच वाजता अज्ञात चोरट्यांवर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या संदर्भात अधिक माहिती अशी की, राजेंद्र मथुरादास भाटिया (वय-४५) रा. सोनवद खुर्द ता. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे सोनवद खुर्द शिवारात शेत गट नंबर-३४ मध्ये शेत आहे. या शेतातील विहिरीतील जलपरी व केबल वायर असा एकूण १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल १८ मार्च रोजी सकाळी उघडकीला आला. या संदर्भात राजेंद्र भाटिया यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर २० मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दीपक पाटील करीत आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content