जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या शेतकरी अनेक बाजूंनी अडचणीत आला असतांना त्यांना वार्यावर सोडून गिरीश महाजन हे विदेशात गेल्याची घणाघाती टिका आज आमदार एकनाथराव खडसे यांनी केली आहे. ते राष्ट्रवादीतर्फे आयोजीत उपोषणाला भेट दिल्यानंतर बोलत होते.
शेतकर्यांच्या विविध पिकाला हमीभाव मागणीसाठी जामनेर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील विजय देसले राष्ट्रवादी नेते संजय दादा गरुड राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विलास राजपूत युवक अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये शेतकर्यांच्या कापसाला पंधरा हजार रुपये हमीभाव देण्यात यावा कांद्याला पाच हजार रुपये हमीभाव देण्यात यावा पिक विमा कंपनीकडून मदत मिळावी वन्यप्राण्यामुळे शेतकर्यांचा झालेल्या नुकसानीची तात्काळ नुकसान भरपाई मिळावी महावितरण करून शेतकर्यांचे वीज तोडणी थांबवण्यात यावी शेती पंपाला दिवसा बारा तास सुरळीत देण्यात यावी अशा मागण्यासाठी एक दिवशी लक्ष उपोषण राष्ट्रवादीतर्फे जामनेर येथे करण्यात आले आहे.
दरम्यान, आमदार एकनाथराव खडसे यांनी उपोषणाला भेट दिली. याप्रसंगी ते म्हणाले की, जळगाव जिल्ह्यामध्ये ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील हे दोघे एकनाथराव शिंदे व फडणवीस यांचे जवळचे असून त्यांनी शेतकर्यांचा पिकाचा हमीभावासाठी बोललं पाहिजे. कारण आज जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकर्याचे नुकसान झाले आहे त्याचबरोबर कपाशी पिकाला भाव मिळत नाही एकेकाळी गिरीश महाजन हे सात हजार रुपये कपाशीला भाव मिळण्यासाठी आंदोलन केले होते मग आता गेले कुठे शेतकर्यांना वार्यावर सोडून ते फॉरेन दौर्यावर फिरत आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी बोलताना केली.
खडसे पुढे म्हणाले की, आज शेतकर्यांच्या कांद्याला भाव नाही कपाशीला भाव नाही ज्वारीला भाव नाही त्यामुळे शेतकरी हवालदील झाला असून उद्या नवीन कपाशी पिकाची लागवड होणार आहे. मात्र कपाशीला भाव नसल्यामुळे आजही मागच्या वर्षाची कपाशी घरात पडून आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून या शेतकर्यांच्या समस्या कडे लक्ष द्यायला सरकारकडे वेळ नाही. येणार्या अधिवेशनामध्ये मी शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत विधानसभेत आवाज उठवणार आहे अशी प्रतिक्रियाजामनेर येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तर्फे करण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषण प्रसंगी बोलताना एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.