शेंदुर्णी येथे किरकोळ कारणावरून कुटुंबाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

जामनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी गावात राहणाऱ्या एका कुटुंबाला घराचे दरवाजा व खिडक्या काढण्याच्या कारणावरून दुसऱ्या गटातील ५ जणांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.  याप्रकरणी मंगळवारी १६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता  पहुर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, आनंदा रतन गुजर (वय-५७, रा. प्रभू पुष्पनगर, शेंदुर्णी) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार १६ मे रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या घराच्या मागच्या भिंतीस असलेले खिडकी व दरवाजा काढू नका या कारणावरून शेजारी राहणारे लखन विठ्ठल गुजर, मिराबाई विठ्ठल गुजर, राजू भीला गुजर, चेतन राजीव गुजर आणि लताबाई राजू गुजर यांनी लोखंडी रॉड व लाकडी काठीने आनंदा गुजर यांच्यासह त्यांच्या घरातील हर्षदा गणेश गुजर, वंदना वसंत गुजर, सीमा संतोष गुजर, चित्रा भरत गुजर, अनिशा भरत गुजर, सुभाष गुजर या सहा जणांना बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच धमकी दिली. या संदर्भात आनंदा रतन गुजर यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार शशिकांत पाटील करीत आहे.

Protected Content