शिवीगाळ करत महिलेला दोघांकडून बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरात महिलेला शिवीगाळ करत दोन जणांनी चापटाबुक्क्यांसह लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना शनीवारी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरात ममता नागेश मेढे या वास्तव्यास आहेत. याच परिसरात राहणाऱ्या गौरव भिका कोलते व मनिषा भिका कोलते हे राहतात. कोलते यांच्याकडे आलेल्या काही लोकांनी ममता मेढे यांच्या घरासमोर त्यांच्या दुचाकी उभ्या केल्या होत्या. ज्यांच्या दुचाकी होत्या ते लोक शनिवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत मोठमोठ्याने शिवीगाळ करुन बोलत होते, अशा लोकांना थांबु देत जावू नका असे ममता मेढे ह्या कोलते यांना बोलण्याने त्याचा राग आल्याने मनिषा कोलते यांनी शिवीगाळ करुन चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, तर गौरव कोलते यानेही ममता मेढे यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने डोक्यात मारुन दुखापत केली. याप्रकरणी ममता मेढे यांच्या फिर्यादीवरुन सायंकाळी गौरव भिका कोलते व मनिषा कोलते या दोन जणांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल उषा सोनवणे ह्या करीत आहेत.

Protected Content