शाहूनगरातील भोईटे गल्लीत बंद घर फोडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अहमदाबाद येथे नातेवाईकांकडे लग्नासाठी गेलेल्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरटयांनी डल्ला मारल्याची घटना शाहूनगरातील भोईटे गल्लीत मंगळवारी १६ मे रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली. याठिकाणाहून चोरट्यांनी ७० हजारांचा सोन्याचे व चांदीचे दागिने लंपास केले असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील शाहू नगरातील भोईटे गल्लीत शरिफ मोहम्मद भिस्ती हे आपल्या कुटुंबियांसह राहत असून त्यांच्या वरच्या मजल्यावर त्यांचा मोठा भाऊ वास्तव्यास आहे. शुक्रवारी ५ मे रोजी ते गुजरातमधील अहमदाबाद येथे नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले होते. मंगळवारी १६ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास भिस्ती यांचा भाचा ईरशाद गुलाम भिस्ती याचा त्यांना फोन आला. त्याने तुमच्या घराचा कडी कोयंडा तोडलेला असल्याचे सांगितले. भिस्ती यांनी त्याला घरात जावून पाहणी करण्यास सांगितले. त्यानुसार ईरशाद हा गेला असता त्याला कपाटात ठेवलेले ७० हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने दिसून आले नाही. घरात चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर मंगळवारी १६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता शरिफ भिस्ती यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content