शालेय पोषण आहारात तिखटची गुणवत्ता खराब; अधिकाऱ्‍यांनी लक्ष देण्याची मागणी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेरात शालेय पोषण आहारात देण्यात येणाऱ्या तिखटची गुणवत्ता खराब येत असल्याची ओरड होत आहे. याकडे शालेय पोषण अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

 

रावेर तालुक्यात जिल्हा परिषद शाळामध्ये मुलांना खिचडी शिजवून दिली जाते. परंतु खिचडी बनवण्यासाठी येणाऱ्या साहीत्य पुरववितांना येणाऱ्या  तिखटची कॉलेटी खराब येत आहे. शाळांना पुरवलेले भुरकट तिखट पाण्यात टाकल्याल कॉलेटी खराब येत आहे. रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पोषण आहाराच्या माध्यमातुन खिचड़ी शिजवून दिली जाते.परंतु तिखटची कॉलेटी खराब येत असल्याने खिचडी खातांना मुलांच्या तोंडाला स्वाद येत नाही. या संदर्भात गट शिक्षणाधिकारी दखणे यांच्याशी संपर्क केला असता आम्ही तत्काळ तिखट पुरवठा करणाऱ्‍या कंपनीला या बाबत कळवणार असून लवकरच दर्जेदार तिखट संबधित शाळांना पूरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Protected Content