व्यापाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकीची हवा काढण्याच्या कारणावरून बळीराम पेठेतील व्यापाऱ्याला दोन जणांनी दुकानात घुसून बेदम मारहाण करत दुकानातील सामांनाची तोडफोड केल्याची घटना घडली होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला  आहे. याप्रकरणी गुरूवारी १५ जून रोजी रात्री १० वाजता दोन जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील बळीराम पेठेतील केडी प्लाझा येथे कमलेश सदानंद मोतीरामानी (रा. गणपती नगर) यांचे दुकान आहे. बुधवारी १४ जून रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एका महिलेच्या गाडीच्या चाकाची हवा कुणीतरी काढली होती. याबाबत मुजहिर बशीर शेख रा. बळीराम पेठ आणि हिमांशू सुदीप दास रा. मेहरूण, जळगाव या दोन जणांनी व्यापारी कमलेश मोतीरामानी यांच्यावर संशय घेवून त्यांच्या दुकानात शिरले आणि त्यांनी कमलेश मोतीरामानी यांच्यावर हल्ला करीत त्यांना मारहाण केली. यावेळी त्यांनी दुकानातील साहित्याची देखील नुकसान करुन ते निघून गेले. ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुरूवारी १५ जून रोजी रात्री १० वाजता व्यापारी कमलेश मोतीरामानी यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी मुजहिर बशीर शेख रा. बळीराम पेठ आणि हिमांशू सुदीप दास रा. मेहरूण, जळगाव यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे.

Protected Content