वाढदिवसाच्या कार्यक्रमात तरूणाला चौघांकडून मारहाण

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील सोनाळा फाट्याजवळ वाढदिवसाच्या कार्यक्रमात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणाला चार जणांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिली, याबाबत पहूर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील सोनाळा फाट्याजवळ असलेल्या हॉटेल रोहिणीच्या मागे वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान जेवणाचा कार्यक्रम सुरू असताना माशांचे उष्टे पीस अंगावर पडल्याच्या कारणावरून रविकिरण रामलाल चौधरी रा. खादगाव ता. जामनेर या तरुणाला योगेश भरत चौधरी, रमेश तापीराम चौधरी, राजीव तापीराम चौधरी, पंकज भरत चौधरी सर्व रा. खादगाव ता. जामनेर यांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर लोखंडी रॉड मारून हाताचे बोटांवर दुखापत केली. शिवाय इतरांनी लाथाडून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर रविकिरण चौधरी आणि पहूर पोलिसांना धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहे.

Protected Content