लोंढरी येथील विवाहितेला ५ लाखांची मागणी

जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील लोंढरी येथील माहेर असलेल्या विवाहितेला ५ लाखांसाठी छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील लोंढरी येथील माहेर असलेल्या कविता बंडू पवार (वय-३५) यांचा विवाह मध्यप्रदेशातील वरझडी येथील बंडू भावा पवार यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पती याने विवाहितेला शेती घेण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणावे, अशी मागणी केली. विवाहितेने  पैशांची पूर्तता न केल्यामुळे तिला मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच सासरे, सासू, दीर, दिरानी यांनी देखील पैशांसाठी तगादा लावला. हा छळ सहन न झाल्याने त्या माहेरी निघून आल्या. शुक्रवार १० मार्च रोजी दुपारी ३ वाजता विवाहितेने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती बंडू भावा पवार, सासरे भावा गोकुळ पवार, सासू जानकीबाई भावा पवार, दिर जगदीश भावा पवार आणि रमाबाई भावा पवार सर्व रा. वरझडी ता. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश यांच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भरत लिंगायत करीत आहे.

Protected Content