रावेर लोकसभेत मोदी सरकारच्या कामांबद्दल जनता खूश – नंदकिशोर महाजन

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या कार्यकाळात लोककल्याणकारी योजनेचा फायदा रावेर लोकसभेतील जनतेला मोठ्या प्रमाणात झाला. शासनाच्या अनेक योजनांचा लाभ लाभार्थांना थेट झाला आहे. म्हणून भाजपा सरकारबद्दल जनता खूश असल्याचे मत नंदकिशोर महाजन यांनी व्यक्त केले.

रावेर लोकसभेत महाजनसंपर्क अभियान भाजपाचे पदाधिकारी राबवित आहे. याचाच भाग म्हणून रावेरात भाजपा तर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी रावेर लोकसभा निवडणुक प्रभारी प्रमुख नंदकिशोर महाजन, भाजपा किसानसभा उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुरेश धनके, रावेर-यावल विधानसभा प्रमुख अमोल हरिभाऊ जावळे यांनी देखिल भाजपा व मोदी सरकारच्या कामांची माहिती उपस्थित माध्यमांना दिली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, रावेर लोकसभा संयोजक सुनिल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, भाजपा शहराध्यक्ष दिलीप पाटील, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, सी.एस. पाटील, धनगर समाजाचे युवानेते संदीप सावळे, भाजपा उपाध्यक्ष हरलाल कोळी, माजी पंचायत समिती उपसभापती पी के महाजन, जुम्मा तडवी, वासुदेव नरवाडे आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content