रावेर पिपल्स बँक निवडणूक : आतापर्यंत १३ उमेदवारी अर्जांची विक्री

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  रावेर पिपल्स बँकेत आता पर्यंत फक्त तेरा उमेदवारी अर्जांची विक्री झाली असुन आता पुढचे फक्त चार दिवस उमेदवारी अर्ज विक्री व स्विकारले जाण्यासाठी शिल्लक आहे. सहकार क्षेत्रात बाजार समिती नंतर पिपल्स बँकेत मोठी रस्सीखेस होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु उमेदवारांकडून बँकेला अल्पप्रतिसाद मिळत आहे.

 

रावेर पिपल्स बँकेचा बिगुल वाजुन चार दिवस उलटले असुन पुढचे चार दिवस शिल्लक आहे.अतिशय प्रतिष्ठेची मानली जाणारी पिपल्स बँकेत यंदा उमेदवारांकडून अल्पसा प्रतिसाद मिळत आहे.दि ११उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.लागोपाठ सुट्या आल्याने इच्छुक उमेदवारां कडून उमेदवारी अर्जच घेतली गेले नाही.आता पर्यंत तेरा अर्ज विक्री झाले असुन एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.रावेर नगर पालिकेची रंगीत तालीम म्हणून रावेर पिपल्स बँके कडे पाहीले जाते.

Protected Content