राऊतांनी ठाकरेंचे राजकारण संपविले : श्रीरंग बारणे

पंढरपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उद्धव ठाकरे हे चांगला माणूस आहेत. पण संजय राऊतांनी त्यांचे राजकारण संपवल्याचा आरोप करत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज जोरदार टिकास्त्र सोडले. ते पंढरपुरात दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

 

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधला. यात ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंची प्रतिमा मलिन करण्याचं काम संजय राऊतांनी केल्याचे बारणे म्हणाले.  राजकारणाला न शोभणारी वक्तव्य संजय राऊत करत असल्याचे बारणे म्हणाले. तथापि, उद्धव ठाकरे हे जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या जवळ बसल्यावरून बारणेंनी टीका केली. हा प्रकार दुर्दैवी आहे. हिंदुत्त्वाचा खरा वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. ते अतिशय प्रभावीपणे राज्यात काम करत असल्याचे बारणे म्हणाले.

 

दरम्यान, राज्याचे  विरोधी पक्षनेते अजित पवार  यांनी पुन्हा एकदा ताकद लावून पाहावी, मावळमध्ये मीच जिंकणार असल्याचा विश्वास श्रीरंग बारणे  यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, मावळ लोकसभा मतदारसंघात पार्थ पवार यांचा मी २ लाख ५३ हजार मतांनी पराभव केला आहे. २०२४ च्या निवडणुकीतही मी मावळ मतदारसंघातून विजयी होईल असा विश्वास बारणेंनी व्यक्त केला. तर,  देशभरातील सगळे विरोधी पक्ष एकत्र आले तरी २०२४ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा केंद्रात भाजपचे एनडीएचं सरकार येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

Protected Content