यावल बाजार समितीच्या सभापतीसाठी प्रचंड चुरस !

यावल-अय्यूब पटेल | येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनलने दणदणीत यश संपादन केल्यानंतर आता सभापतीपदी नेमके कोण विराजमान होणार ? याबाबत मोठी चुरस निर्माण झाली आहे.

यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यावलच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले असुन, सभापतीपदासाठी चार प्रबळ उमेदवारांचे नांव चर्चेला जात आहे. यात सभापतीपदाची धुरा नेमकी कुणाच्या हाती येणार या विषयाकडे संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागले असुन येत्या १८ मे रोजी हे निश्चित होणार आहे.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षीक निवडणुक नुकतीच पार पडली असुन या निवडणुकीत भाजपा सेनेच्या महायुती प्रणीत सहकार पॅनलने १८ पैक्की१५ जागांवर दणदणीत विजय संपादन करून बहुमत मिळवले आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीचे वेध लागले असुन , येत्या १८ मे रोजी सभापतीची निवड होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या सभापतीपदाच्या निवडसाठी भाजपा सेना महायुतीच्या वतीने मागील कार्यकाळात उपसभापतीपदीची यशस्वी धुरा सांभाळत विकास सोसायटीच्या माध्यमातुन शेतकर्‍यांच्या शेतमालास शासनाच्या हमी भावाच्या रूपात न्याय मिळुन देण्याचे कार्य करणारे राकेश वसंत फेगडे यांचे नांव अंतर्गत चर्चेला जात आहे.

दुसरे नाव माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पंचायत समितीच्या माध्यमातुन सर्वसामान्याच्या समस्या सोडविण्या साठी प्रयत्न करणारे व पक्ष संघटनाच्या बांधणीची धुरा मागील पाच वर्षा पासुन सातत्याने यशस्वीरित्या सांभाळणारे हर्षल गोविंदा पाटील यांच्या देखील नांवाची चर्चा आहे. तिसरे नांव दोन वेळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद भुषविणारे स्व.हरिभाऊ जावळे यांचे निकटवर्ती व शेतकर्‍यांचे प्रश्न मांडणारे कृषी भुषण नारायण शशीकांत चौधरी यांचे आहे. तर आमोदा येथील उमेश पाटील यांचे नाव चर्चेत आहे.

दरम्यान, येत्या १८ मे रोजी या चौघांपैकी कुणाची वर्णी लागणार यासाठी थोड थांबावे लागणार आहे. आताच्या क्षणाला सभापतीपदाच्या ईच्छुक उमेदवारात राकेश वसंत फेगडे, हर्षल गोविंदा पाटील, नारायण शशीकांत चौधरी हे प्रबळ दावेदार जरी असले तरी यांच्यासह उमेश पाटील आणी उज्जैनसिंग राजपुत यांच्याही नांवाची सभापती पदासाठी चर्चा आहे. अर्थात, गिरीशभाऊ महाजन, ना. गुलाबराव पाटील, प्रा. चंद्रकांत सोनवणे आणि अमोल जावळे यांच्या संमतीने सभापती आणि उपसभापतीपदाची निवड होईल हे देखील तितकेच खरे आहे. यामुळे नेत्यांची पसंती कुणाला मिळणार यावरच सभापती आणि उपसभापती यांची निवड होणार असल्याची बाब स्पष्ट आहे.

Protected Content