यात्रोत्सवात महिलेच्या गळ्यातील मंगलपोत तोडली

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील सखाराम महाराज यात्रोत्सवाच्या कार्यक्रमात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी तोडून चोरून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात बुधवार ३ मे रोजी रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांवर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अमळनेर शहरात संत सखाराम महाराज मंदिर संस्थांच्या वतीने रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवात रथोत्सव सुरू असताना मीना रवींद्र सोनवणे (वय-४०, रा. कुंभारटेक, अमळनेर) या महिला यात्रोत्सवात असताना त्यांच्या गळ्यातील १२ हजार रुपये किमतीची सोन्याची मंगलपोत अज्ञात चोरट्याने तोडून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिला मीना सोनवणे यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तींनी विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विलास पाटील करीत आहे.

Protected Content