महिलेचे सामान घरातून फेकून देत दोघांकडून मारहाण

जळगाव लाईव्ह ट्रेन्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगर परिसरात असलेल्या मराठी शाळेजवळ कौटुंबिक वादातून महिलेचे सामान घरातून बाहेर फेकून दोन जणांनी दीरासह पुतण्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सोमवारी २२ मे रोजी रात्री ८ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अश्विनी राहुल महाजन (वय-२५, रा. मराठी शाळेजवळ, हरीविठ्ठल नगर, जळगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे एकत्रीत कुटुंब असल्याने सोबत दीर संजय प्रल्हाद महाजन व इतर राहतात. २२ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास महिलेचे दीर संजय महाजन यांच्यासोबत झालेल्या कौटुंबिक वाद झाला. या वादातून संजय महाजन याने महिलेचे घरातील सामान घराबाहेर फेकून दिले तर महिलेला घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर दीर संजय प्रल्हाद महाजन व पुतण्या विकास संजय महाजन या दोन जणांनी महिलेला काठीने मारहाण करून दुखापत केली. तसेच मोबाईलची नुकसान केले. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रात्री ८ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात संजय प्रल्हाद महाजन आणि विकास संजय महाजन दोन्ही रा. हरिविठ्ठलनगर यांच्याविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील पाटील करीत आहे.

Protected Content