महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील एका भागात डॉक्टर महिलेचा ती काम करत असलेल्या रुग्णालयातच विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुरुवार एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असे की, जळगाव शहरातील एका भागातील डॉक्टर महिला एमआयडीसी परिसरात असलेल्या एका रुग्णालयात काम करते. नेहमीप्रमाणे डॉक्टर महिला १६ जून रोजी दवाखान्यात कामावर आली. याठिकाणी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गर्दीचा फायदा घेत अनिल जीवन पाटील याने डॉक्टर महिलेचा वारंवार स्पर्श करत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकाराबाबत महिला डॉक्टरने सहा दिवसानंतर गुरुवारी दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन अनिल जीवन पाटील याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय पाटील हे करीत आहेत.


Previous articleहॉकर्सधारकांचा महापालिकेवर मोर्चा
Next articleतरूणाची दुचाकी लांबविली
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.