महापालिकेच्या पार्किंगमधून महापालिका कर्मचाऱ्याची दुचाकी लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महापालिकेच्या पार्किंगमधून महापालिका कर्मचाऱ्याची दुचाकी लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवार, ६ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील हरेश्वर नगर येथे संजय अनंत वैद्य हे वास्तव्यास आहेत. ते महापालिकेत नोकरीला आहेत. ३ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास संजय वैद्य हे नेहमीप्रमाणे महापालिकेत ड्युटीवर आले. यादरम्यान त्यांनी त्यांची दुचाकी एम.एच. १९ बी.टी. ९४३३ ही महापालिकेच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. काम आटोपून दुपारी २ वाजता घरी जाण्यासाठी निघाले असता, दुचाकी आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने तीन दिवसानंतर शनिवारी सायंकाळी संजय वैद्य यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन शहर पोलीस ठपण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content