मनवेल विकासोच्या पंचवार्षीक निवडणूकीत चौथ्यांदा सर्व संचालक बिनविरोध

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  तालुक्यातील मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकीत १३ जागा अखेर बिनविरोध झाल्या आहे. विनविरोध करण्याचे ही चौथी वेळ आहे.

 

थोरगव्हाण, पथराडे, दगडी, पिळोदा खुर्द,व मनवेल या पाच गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या मनवेल येथील विविध कार्यकारी सहकारी  सोसायटीच्या १३ जागा करीता होऊ ३ बिनविरोध तर १० जागा करीता १५ अर्ज शिल्लक होते त्यात ५   उमेदवारांनी माघार घेतल्याने १३ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

 

मनवेल विविध कार्यकारी सहकारी सोसायटी गेल्या ८ ते १० वर्षा सून सतत तोट्यामध्ये असुन,या निवडणुकीसाठी होणारे खर्च वाचावे म्हणून तीन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्याने यावेळी सुध्दा संस्थेच्या खर्च व्यर्थ जाऊ नये म्हणून  थोरगव्हाण येथील भरत धनसिंग चौधरी यांनी सर्व आजी,माजी चेअरमन ,सचांलक व सभासद यांच्याशी सोसायटी हिताच्या दृष्टीकोणातुन चर्चा करुन तेरा जागा निवडणुक न लढवता बिनविरोध निवडुन आणल्याने त्यांनी केलेल्या सहकार हिताच्या दृष्टीने मध्यस्थीती करून घेतलेल्या निर्णयाचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे.

 

या बिनविरोध निवडणुकीत सर्व साधारण आठ जागेतुन युवराज संतोष पाटील (थोरगव्हाण), गयभू रामदास चौधरी (थोरगव्हाण), विनोद श्रावण पाटील (थोरगव्हाण), कांतीलाल मोतीलाल पाटील (पिळोदा खुर्द), धर्मराज हिरामण पाटील (पिळोदा खुर्द), हुकूमचंद मंगलसिंग पाटील (मनवेल), वासुदेव सिताराम पाटील (मनवेल), काशिनाथ पाटील (मनवेल), इतर मागासवर्गीय जागेतुन भरत धनसिंग चौधरी (थोरगव्हाण) महिला राखीव दोन जागेतुन योगिता दिपक पाटील (मनवेल), शानुबाई भागवत पाटील तर वि.जा.भ.जा.विमाज जागेतुन पथराडे येथील हरी तुकाराम धिवर अशा तेरा जागा बिनविरोध निवडुन आल्या आहे. या सर्व संपुर्ण निवडणुक प्रक्रीयेत निर्णय अधिकारी म्हणून के.व्हि.पाटील यांनी काम पाहिले तर त्यांना संस्थेचे सचिव सुनिल सुरवाडे, क्लार्क सुकदेव पाटील यांनी सहकार्य केले.

Protected Content