भुसावळ प्रतिनिधी । श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि डायलिसिस युनिट व श्री कल्याणी चॅरिटेबल यांच्या संयुक्त विद्यमाने बेघर लोकांना ब्लँकेटचे वाटप करून मायेची उब मिळाली आहे.
उष्ण तापमानामुळे भुसावळ शहर प्रसिद्ध आहे. पण यावर्षी पारा घसरला असून भुसावळकर कडक थंडीचा अनुभव घेत आहेत. पण २३ रोजी रात्री १० वा. शहरातील जामनेर रोड , बस स्थानक , गांधी पुतळा , यावल नाका , अकलूज या ठिकाणी जाऊन गरजवंतांना मोफत ब्लॅंकेट वाटप यावेळी श्री रिदम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि डायलिसिस युनिट चे डॉ. महेश पांगळे , डॉ. कुशल पाटील ,श्री कल्याणी चॅरिटेबलचे गौतम चोरडिया यांनी केले. हा उपक्रम सातत्याने अजून काही दिवस राबला जाणार असून शहर व परिसरातील गरजवंत बेघरांचा शोध घेऊन त्यांना ब्लँकेट वाटप केले जाणार आहे.