भडगाव येथे २९ मे रोजी स्त्री शक्ती शिबिराचे आयोजन

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथे दिनांक २० मे रोजी स्त्री शक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर श्री शक्ती शिबिराचे आयोजन तालुका पातळीवर भडगाव येथे दिनांक २९ मे रोजी पंचायत समिती सभागृह भडगाव येथे आयोजन करण्यात आलेले आहे. हे शिबिर सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत आयोजीत करण्यात आले आहे.

 

समस्याग्रस्त व पीडित महिलांना व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या न्याय हक्काचे संरक्षण होऊन महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. महिला लोकशाही दिनाच्या धर्तीवर सदर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर तालुका पातळीवर आयोजित करण्यात येणार आहे.

 

यासाठी तालुक्यातील महिलांनी आपले प्रश्न सोडवण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे ही विनंती महिलांनी पंचायत समिती कार्यालयाशी, तहसील कार्यालयाशी तसेच बाल विकास प्रकल्प कार्यालयाशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा. असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी भडगाव यांनी केले आहे.

Protected Content