बोढरेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला !

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील बोढरे शिवारात होणारा बालविवाह ग्रामसेवकांसह पोलिसांच्या सतर्कतेमुळे आज रोखण्यात यश आले आहे.

तालुक्यातील बोढरे शिवारातील एकाच्या शेतात एका अल्पवयीन मुलामुलींचा बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानंतर लागलीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सतीश बंडगर यांच्या मदतीने विवाह रोखण्यात आले. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लोकेश पवार व ग्रामसेवकांनी हि कारवाई केली. त्याचबरोबर ग्रामसेवक सतीश बंडगर यांनी संबंधितांना नोटीस बजावली आहे. तसेच सदर विवाह रोखण्यात बोढरे येथील सामाजिक कार्यकर्ते गुलाब राठोड यांचाही मोलाचा योगदान लाभले.

Protected Content