बेडूक कितीही फुगला तरी… ! : भाजपच्या खासदाराची शिंदेंवर टिका !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील सत्ताधार्‍यांमध्ये विसंवाद दिसून येत असतांना भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शेलक्या शब्दांमध्ये टिका केल्याने राजकीय वर्तुळ हादरले आहे.

 

भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना साधताना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. बेडूक किती फुगला तरी हत्ती बनत नाही, अशा शब्दात अनिल बोंडे यांनी टिकास्त्र सोडले. शिंदे चांगले मुख्यमंत्री आहेत. मात्र त्यांना त्याच्या आजूबाजूलचे चुकीचे सल्ले देत आहेत. तसेच, शिंदे यांना ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र वाटायला लागलाय, असा टोला देखील बोंडे यांनी मारला.

 

याप्रसंगी बोंडे म्हणाले की, हा सर्व्हे नेमका केला कोणी? तो ठाण्यापुरत मर्यादित होता का? की महाराष्ट्राचा होता? असा सवाल त्यांनी केला. तर, ठाकरे सरकार पाच वर्ष राहिलं असतं तरी भाजपच्या २०० हून अधिक जागा निवडून आल्या असत्या. आता आमचं सरकार अडीच वर्ष राहणार असून आमच्या अजूनही २००च्यावर जागा निवडून येतील, असं ते म्हणाले.

Protected Content