खामगाव : प्रतिनिधी । बुलडाणा जिल्ह्यामध्ये आजपासून ३० ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांसाठी कोविड लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.
लसीकरण मोहीमेस आज ७ आरोग्य संस्थांमधून सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा रुग्णालय बुलडाणा, ग्रामीण रुग्णालय चिखली, ग्रामीण रुग्णालय जळगांव जामोद , उप जिल्हा रुग्णालय शेगांव, ग्रामीण रुग्णालय मेहकर, प्रा.आ.केंद्र बोराखेडी (ता. मोताळा ), प्रा.आ.केंद्र नांदुरा आदींचा समावेश आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लवकरच लसीकरण मोहीम कार्यान्वित होईल, असे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ गोफणे यांनी कळविले आहे.