नांदुरा लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खांबगाव येथील मुलांच्या वस्तीगृहामध्ये एका खोलीत गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ५ जिवंत काडतूस आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खामगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खामगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, खांमगाव शहरातील वाडी परिसरात असलेल्या संन्मती मुलांचे वस्तीगृह येथे एका मुलाकडे अवैधरित्या देशी कट्टा असल्याचे गोपनीय माहिती खामगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार खामगाव पोलीस ठाण्याचे सपोनि गौतम इंगळे, सहाय्यक फौजदार मोहन करूटाले, पोलीस कॉन्स्टेबल अमरदीप ठाकूर, गणेश कोल्हे, अंकुश गुरुदेव, पोलीस कॉन्स्टेबल विष्णू चव्हाण यांनी कारवाई करत संशयित आरोपी नितीन राजीव भगवत (वय-२२) रा. आंबेटाकळी ता. खामगाव जि. बुलढाणा याच्या रूमची चौकशी केली असता, त्याच्या बॅगमध्ये १० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा देशी कट्टा (बंदूक) आणि ५ जिवंत काडतूसे असे मिळून आले. या संदर्भात त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान पोलिसांनी हे अवैध व विनापरवाना असल्याचे गावठीकट्टा जागीच हस्तगत केला आहे. त्यानुसार संशयित आरोपी नितीन भगत याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी खामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पुढील चौकशी सुरू असून याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम इंगळे करीत आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.