बसने मोटारसायकलला उडविले : एक ठार, तीन जण जखमी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरापासून जवळच राष्ट्रीय महामार्गावर बसने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत एक जण ठार झाला असून ती जखमी झाले आहेत.

 

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, आज दिनांक १२ जुन रोजी दुपारी ३ते ३,३शवाजेच्या सुमारास बर्‍हाणपूर-अंकलेश्वर राज्य मार्गावरील यावल साकळी दरम्यानच्या यावल शहरापासुन दोन किलोमिटर लांब असलेल्या महाजन पॅट्रोल पंपाजवळ अपघात झाला.

 

यात  यावलहुन चाळीसगाव जाणार्‍या एमएच १४ बिटी २१४४ या क्रमांकाच्या बसने एम पी ०९क्युटी ३९३९या मोटारसायकलला धडक दिली. यात दयाराम बारेला (वय २५ वर्ष राहणार जामुनझीरा तालुका यावल) हा जण ठार तर मांगीलाल कोशा बारेला वय२८ वर्ष, सुनिता मांगीलाल बारेला वय २५ वर्ष, आणी चिंकी बारेला वय३ वर्ष सर्व शिरवेल ( मध्य प्रदेश )  तिन जण जखमी झाल्याचे वृत आहे.

 

दरम्यान जख्मींना यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ शिवदास चव्हाण यांनी प्रथम उपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ जळगाव येथे जिल्हा सामान्य रग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Protected Content