प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळ व बिस्किटचे वाटप

पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी !

     वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त १० मे रोजी पाचोरा येथील वंचित बहुजन आघाडीतर्फे पाचोरा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ व बिस्किटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा संगिता साळुंखे, मा. तालुका अध्यक्ष अनिल लोंढे, अॅड. विनोद गायकवाड, आकाश बनसोडे, संतोष कदम, समता सैनिक दलाचे गणेश बागुल, राजु सपकाळे हे उपस्थित होते. यावेळी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात नव्यानेच पदभार स्वीकारलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतिष टाक यांचा पाचोरा वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व सदस्यांनी स्वागत व सत्कार केला. यावेळी डॉ. अमित साळुंखे, रुग्णवाहिका चालक मनोज पाटील, वाय. डी. पाटील हे उपस्थित होते.

Protected Content