पोलिसांच्या सतर्कतेने लुटमारीच्या गुन्ह्यातील दोन संशयित जेरबंद

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लुटमारीच्या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना पोलीसांच्या सतर्कने जेरबंद करण्यात आले आहे. दोघांना जारगाव चौफुलीवरून सापळा रचुन अटक केली आहे.

जळगांव येथील रामानंद नगर पोलिस स्टेशनमध्ये उमेश गोकुळ राठोड व राकेश गोकुळ राठोड रा. समता नगर, जळगांव यांचे विरुध्द गु. र. नं. २००/२०२३ भादवी कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल आहे. २१ जुन रोजी उमेश राठोड व राकेश राठोड हे जळगांव हुन पाचोऱ्याच्या दिशेने एम. एच. १९ डी. टी. २८५३ या पल्सर मोटरसायकलने जात असल्याची माहिती जळगांव पोलिसांनी पाचोरा पोलिस स्टेशनला दिल्यानंतर पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष पोलिस काॅन्स्टेबल विश्वास देशमुख व सचिन निकम यांनी पाचोरा शहरातील जारगाव चौफुलीवर नाकाबंदी करत व सापळा रचून उमेश राठोड व राकेश राठोड यांना शिताफीने ताब्यात घेतले.

पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये आणले. दरम्यान उमेश राठोड व राकेश राठोड यांचा पाठलाग करत असलेल्या जळगांव येथील एम. आय. डी. सी. पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल किशोर पाटील, छगन तायडे, किरण पाटील, विजय खैरे, रेवानंद साळुंखे, रविंद्र चौधरी, उमेश पवार या पथकास दोन आरोपी हे मोटरसायकल क्रं. एम. एच. १९ डी. टी. २८५३ सह सुखरुप स्वाधीन केले. पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल विश्वास देशमुख व सचिन निकम यांच्या सतर्कतेने दोन आरोपी जेरबंद करण्यात आल्याने विश्वास देशमुख व सचिन निकम यांचे कौतुक केले जात आहे.

Protected Content