पैशांसाठी विवाहितेचा पतीसह सासरच्या मंडळींकडून छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील आझाद नगर येथील विवाहितेचा पैशांसाठी छळ करणाऱ्या पती व सासू या दोन जणांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की, जळगाव शहरातील आव्हाणे रोड परिसरातील लक्ष्मीनगर येथील निलोफर मुदस्सर पिंजारी वय २३ यांचा जळगावातीलच रामानंदनगर परिसरातील आझाद नगर हुडको येथील मुदस्सर फारुख पिंजारी यांच्याशी झाला आहे. लग्नानंतर काही दिवसानंतर निलोफर हिने माहेरुन गाडी घेण्यासाठी तसेच दुकान घेण्यासाठी दोन लाख रुपये आणावेत अशी मागणी केली, त्यानुसार निलोफर हिने एक लाख रुपये दिले. मात्र यानंतरही मे २०१९ ते ८ मार्च २०२३ दरम्यानपती मुदस्सर व सासू फरीदा पिंजारी यांनी वेळोवेळी निलोफर हिचा शारिरीक व मानसिक छळ केला.  छळाला कंटाळून निलोफर माहेरी निघून आल्यानंतरही माहेरी येवून सुध्दा पतीसह सासूने दमदाटी केली, तसेच तीन वेळा तलाक शब्द उच्चारुन,  तीन महिन्यात मी दुसरे लग्न करण्याचे सांगत धमकी दिली. याप्रकरणी निलोफर पिंजारी यांनी गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन निलोफर हिचे पती मुदस्सर पिंजारी व सासू फरीदा फारुख पिंजारी दोन्ही रा. आझाद नगर, हुडको, जळगाव या दोन जणांविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक स्वप्नाली सोनवणे ह्या करीत आहेत.

Protected Content