पैशांवरून तरूणाला दगड मारून दुखापत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे पैशांवरून एका तरूणाला दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे शिवाजी प्रताप राठोड (वय-२९) रा. रामदेववाडी ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी ७ मे रोजी पैसे खर्च करण्याच्या कारणावरून शिवाजी राठोड या तरूणाला गावात राहणारे बबलू इंदल राठोड, ईश्वर इंदल राठोड आणि अनुसया इंदल राठोड या तिघांनी शिवीगाळ करून मारहाण केली. यातील बबलु राठोड याने हातातील दगड शिवाजी राठोड याला मारून फेकल्याने डोक्याला दुखापत झाली आहे. जखमी झालेल्या शिवाजी राठोड या तरूणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी सोमवारी ८ मे रोजी सकाळी ११ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्वप्निल पाटील करीत आहे.

Protected Content