पेपर मीलला भीषण आग; लाखो रूपयांचे नुकसान

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील सुनसगाव येथील पेपर मीलला रविवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता भीषण अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने मोठे नुकसान झाले असून जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

 

अधिक माहिती अशी की,  जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील सुनसगाव येथील एका पेपर मील कंपनीत रविवारी २८ मे रोजी सकाळी १० वाजता अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अवघ्या काही वेळानंतर लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते. लागलेल्या आगीत लाखों रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे. नेमकी ही आग कश्यामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाने बंबासह घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. परंतू ही आग मोठी असल्याने दुपारपर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.

Protected Content