पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते धान्य खरेदीस प्रारंभ !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते  धरणगाव येथिल शासकीय गोदामात शासकीय आधारभूत भरड धान्य ज्वारी व मका खरेदी योजनेस प्रारंभ करण्यात आला . यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्र्यांचे हस्ते  काटा पूजन करून धान्य खरेदी सुरुवात करण्यात आली.

 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांचा शेतकी संघामार्फत सत्कार करण्यात आला.पालकमंत्र्यांनी काटा पूजन करून धान्य विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना पेढा भरून त्यांचा सत्कार केला.

 

ज्वारीला मिळाला 2970 रुपये भाव

धरणगाव तालुक्यात शेतकी संघात सुमारे 700 क्विंटल ज्वारी खरेदी करण्यासाठी नोंदणी करण्यात आली आहे.

 

यांची होती उपस्थिती

या प्रसंगी काग्रेसचे जेष्ठ नेते डी.जी. पाटील , भाजपाचे. सुभाष आण्णा पाटील , तहसिलदार महेद्र सुर्यवंशी, शेतकी संघाचे उपाध्यक्ष – संभाजी चव्हाण, संचालक प्रकाश आण्णा महाजन , रविद्र जाधव , विनोद पाटील , पवण सोनवणे, शरद पाटील,  कल्पना अहिरे , रविंद्र चौधरी , संजय माळी , गोपाल पाटील , कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सभापती सौ. लताबाई पाटील, संचालक जिजाबराव पाटील , ज्ञानेश्र्वर माळी, शिवसेना तालुका प्रमुख गजानन नाना पाटील , गट नेते पप्पू भावे , उपजिल्हा प्रमुख पी.एम पाटील सर , वाल्मीक पाटील, विजय महाजन, दिलीप महाजन , परेश जाधव , विलास महाजन , पवन महाजन , भैय्या महाजन , बुट्या महाजन , संभाजी कंखरे , गोडावून मॅनेजर ज्ञानेश्वर राजपूत , मार्केटचे सचिव नवनाथ तायडे . इत्यादी उपस्थीत होते तसेच शेतकी संघाचे मॅनेजर अरूण पाटील , देविदास पाटील , सागर पाटील, जगदिश पाटील , रोहित चौधरी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक रविंद्र जाधव यांनी केले. सूत्रसंचालन संचालक प्रकाश महाजन यांनी केले तर आभार व्हा.चेअरमन संभाजी चव्हाण यांनी मानले.

Protected Content