पाचोऱ्यातील देशमुखवाडी येथे रक्तगट तपासणी व रक्तदान शिबिराला प्रतिसाद

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील माऊली हॉस्पिटल देशमुख वाडी येथे डॉ. अतुल महाजन माऊली हॉस्पिटल व भारत विकास परीषद यांच्या संयुक्त विद्यमाने २१ मे रोजी रक्तगट तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

 

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माऊली हॉस्पिटलचे संचालक डॉ. अतुल महाजन, वृंदावन हॉस्पिटल चे संचालक डॉ. निळकंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतीथी म्हणुन वृंदावन हॉस्पिटलचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ. निळकंठ पाटील हे उपस्थित होते. या शिबिरात ४५ रक्तदात्यांनी रक्त दान केले. रक्त संकलन करण्यासाठी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र जळगाव यांचे विषेश सहकार्य लाभले.

 

शिबीराचा उद्घाटनप्रसंगी डॉ. अतुल महाजन हे म्हणाले की, रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे सगळं तयार करता येते पण रक्त तयार करता येत नाही. म्हणून आपण सगळ्यांनी रक्तदान करावे, आपण केलेल्या रक्त हे रूग्णांसाठी जीवनदान ठरते. या शिबीराच्या यशस्वीतेसाठी माऊली हॉस्पिटल संचालक डॉ. अतुल महाजन, भारत विकास परिषद अध्यक्ष डॉ. पंकज हरणे, उपाध्यक्ष सतीश जाधव, सचिव कमलेश सोनवणे, सहसचिव सुवर्णा महाजन तसेच माऊली हॉस्पिटलचे कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.

Protected Content