पाचोरा न.पा. कर्मचारी वर्ग सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा नगरपरिषद कर्मचारी वर्ग सहकारी पतसंस्थेची पंचवार्षीक निवडणुक २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठी जाहीर करण्यात आली होती. सदर निवडणुकीत माजी चेअरमन धनराज नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज २४ जानेवारी २०२३ रोजी सोसायटीच्या स्थापनेपासुन प्रथमच बिनविरोध निवडणुक झाली असुन खालील सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

यात सर्वसाधारण मतदार संघ – धनराज नारायण पाटील, भागवत जगन्नाथ पाटील, प्रकाश शंकर पवार, राजेश इंदल कंडारे, अर्जुन लालचंद सुर्यवंशी, निळकंठ लुभा ब्राम्हणे इतर मागासवर्गीय मतदार संघ – चंद्रकांत भगवान चौधरी वि. जा. भ. म. विमाप्र मतदार संघ – रविंद्र रामा धनगर, अनु. जाती – जमाती मतदार संघ – राकेश मंगल फतरोड महीला मतदार संघ – शिलाबाई अनिल ब्राह्मणे, यमुनाबाई गुरूदत्त ब्राह्मणे अशी बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांची नावे आहेत. मा. चेअरमन धनराज नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील ५ वर्षाच्या कार्यकाळात न. पा. सोसायटीचे कर्ज मर्यादा १.२५ वरून २ लक्ष व विशेष कर्ज ५ हजाराहुन ५० हजार करण्यात आलेले आहे. तसेच सोसायटीच्या स्थापनेपासुन प्रथमच शैक्षणिक कर्ज रक्कम रु. २ लक्ष मात्र देण्याची तरतुद करण्यात आली आहे. यात सर्व सभासद, सदस्य यांनी वेळोवेळी चेअरमन धनराज नारायण पाटील व सचिव सुधीर पाटील यांना सहकार्य केल्याने हे शक्य झाले. या कारणाने सर्व सभासदांनी परत पुढील ५ वर्षासाठी सोसायटीचे कार्यभार धनराज नारायण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पॅनलला बिनविरोध निवडुन दिले आहे. पुढील ५ वर्ष धनराज नारायण पाटील हेच आमचे चेअरमन असतील असे सर्व बिनविरोध निवडुन आलेल्या सभासदांचे मत आहे.

Protected Content