नास्त्याची गाडी लावण्यावरून तरूणाला चौघांकडून बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानक परिसरात चहा व नास्त्याची हातगाडी लावण्यावरून एका तरूणाला पाच जणांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी २४ जून रोजी रात्री उशीरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दिपक दत्तू चौधरी (वय-२८) रा. नवरंग चौक, ज्ञानदेव नगर, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रेल्वे स्थानक परिवारात चहा व नास्त्याची हातगाडी लावून आपला उदरनिर्वाह करतो. नेहमीप्रमाणे शुक्रवारी २३ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दिपक चौधरी हा हातगाडीवर होता. त्यावेळी रेल्वेस्टेशन परिसरातील चहा व नास्त्याची गाडी लावू नये यासाठी महेश आधार सोनवणे, दिपक आधार सोनवणे, पवन आधार सोनवाणे, मोनल रत्वेकर आणि पवी जोशी सर्व रा.जळगाव यांनी तरूणाशी वाद घातला. त्यानंती शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तर एकाने धारदार विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. जखमी झालेल्या दिपक चौधरी यांला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दिपक चौधरी याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी महेश आधार सोनवणे, दिपक आधार सोनवणे, पवन आधार सोनवाणे, मोनल रत्वेकर आणि पवी जोशी यांच्याविरोधात शनिवारी २४ जून रोजी रात्री उशीरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Protected Content