जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील नशिराबाद येथील ताज नगरातून अज्ञात चोरट्यांनी 8 बकऱ्यांची चोरी करून व्यावसायिकाचे 34 हजार रुपये किमतीचे नुकसान केल्याचे समोर आले आहे. याबाबत शुक्रवारी 4 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नशिराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख रईस शेख रशीद (वय 32, रा.ताज नगर नशिराबाद ता.जि. जळगाव) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. किरकोळ व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतो ३ नोव्हेंबर रात्री ११ ते ४ नोव्हेंबर सकाळी ६ वाजेच्या दरम्यान त्यांच्या मालकीच्या ३४ हजार रुपये किमतीच्या ८ बकऱ्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घरासमोरून चोरून नेण्याची समोर आले आहे. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर शेख रईस यांनी सर्वत्र परिसरात शोध घेतला, परंतु बकऱ्यांचा थांगपत्ता लागला नाही. अखेर शुक्रवार ४ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहम्मद अफजल खान करीत आहे.