नशिराबाद येथील विवाहितेला १० लाखांसाठी छळ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील माहेर असलेल्या विवाहितेला माहेरहून १० लाख रूपयांची मागणी करत छळ करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवार ३ मे रोजी दुपारी १ वाजता पतीसह सासरच्या मंडळींविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नशिराबाद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील माहेर असलेल्या नम्रता दिपक महाजन यांचा विवाह गावातीलच दिपक विठ्ठल महाजन याच्याशी रितीरिवाजानुसार झाला आहे. लग्नानंतर काही दिवस चांगली वागणूक दिली. त्यानंतर दिपक याने नोकरीसाठी माहेरहून १० लाख रूपये आणावे अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तीला मानसिक व शारिरीक छळ केला. तसेच सासू, सासरे, ननंद यांनी देखील पैशांसाठी पिळवणूक केली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. बुधवारी ३ मे रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती दिपक विठ्ठल महाजन, मालती विठ्ठल महाजन, विठ्ठल शंकर महाजन, हेमलता विठ्ठल महाजन डिंपल विठ्ठल महाजन सर्व रा. नशिराबाद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहे.

Protected Content