धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी इसमाचा मृत्यू

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज चाळीसगाव ते हिरापूर रेल्वेस्थानक दरम्यान घडली आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील चाळीसगाव ते हिरापूर रेल्वे रूळावरील खांबा क्र. कि.मी ३२१/२२-२० दरम्यान एका धावत्या रेल्वेतून अनोळखी इसम खाली पडला. त्यातच त्या इसमाचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी ११:५० वाजताच्या सुमारास घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मयताचे ओळख अद्याप पटलेली नाही. तत्पूर्वी सदर मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. व वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना किशोर सोनवणे हे करीत आहे.

Protected Content