धरणगाव (प्रतिनिधी) सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार तालुक्यात पुन्हा २ नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पाळधी आणि मुसळी येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.
सोमवारी रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार अहवालानुसार तालुक्यात पुन्हा २ नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पाळधी आणि मुसळी येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, दुसरीकडे संबंधीत बाधित रूग्णांच्या रहिवासाचा परिसर सील करण्यात येत असून परिसरात लवकरच फवारणी करण्यात येणार आहे. तालुक्यातील आजवर आढळून आलेल्या कोरोना बाधीतांची एकूण संख्या २०१ इतकी झाली आहे. यातील १७ जण मयत झालेत आहेत. तसेच आतापर्यंत १४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजरोजी कोविड सेंटरला २३ रुग्ण उपचार घेत आहेत. तर बालकवी ठोंबरे विद्यालय आणि कोविड सेंटरला प्रत्येकी २३ आणि लिटील ब्लाझम स्कूलमध्ये ५१ जणांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. तर ७३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी केले आहे.