दारूच्या नशेत जावाईकडून सासूसह पत्नीला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  शहरातील कोठारी नगरात दारू पिऊन आलेल्या जवाईला घरात घेतले नाही, या कारणावरून सासूवर विळ्याने वार करून दुखापत केली तर पत्नीला मारहाण करून जिवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना आरएमएस कॉलनीतील कोठारी नगरात घडली आहे. याप्रकरणी १८ मे रोजी सकाळी साडेसात वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, लता भास्कर पाटील (वय-५२) रा. आरएसएस कॉलनी, कोठारी नगर, जळगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेजारीच त्यांचे जावाई रावसाहेब दामू पाटील आणि मुलगी जान्हवी हे राहतात. गुरूवारी  १८ मे रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रावसाहेब पाटील हा दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी पत्नी जान्हवीने घरात येवून देण्यास मनाई केली. या रागातून सासू लता पाटील यांच्यावर विळ्याने वार करून जखमी केले तर पत्नी जान्हवीला शिवीगाळ व मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी लता पाटील यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवार १८ मे रोजी सकाळी साडेसात वाजता संशयित आरोपी रावसाहेब दामू पाटील याच्यावर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.

Protected Content