दाणाबाजार परिसरातून वृध्दाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली;

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील दाणा बाजार परिसरातील संजय ईलेक्ट्रॉनिक दुकाना समोरून वृध्दाची दुचाकी  अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी गुरूवारी १५ जून रोजी रात्री १० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, हेमंत पुंडलिक इंगळे (वय-६४) रा. खोटे नगर, जळगाव हे १२ जून रोजी रात्री ९ वाजता शहरातील दाणाबाजार परिसरात दुचाकी (एमएच १९ बीएफ ५४३६) ने आलेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी संजय ईलेक्ट्रॉनीक दुकानासमोर पार्किंगला लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी पार्किंगला  लावलेली दुचाकी चोरून नेली. हा बाबत हेमंत इंगळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात शोधाशोध केली. परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरूवार १५ जून रोजी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून दुचाकी चोरी झाल्याची तक्रार दिली. त्यानुसार दिलेल्या तक्रारीवरून रात्री १० वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.

Protected Content