तरूणाला चाकूचा धाक दाखवत आजीला दोघांकडून बेदम मारहाण

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील ढालगाव येथील तरूणाला चाकूचा धाक दाखवत  त्याच्या आजीला दोन जणांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १२ मे रोजी दुपारी अडीच वाजता पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जामनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सागर संजय पवार (वय-२९) रा. ढालगाव ता. जामनेर हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवार १२ मे रोजी सकाळी १० वाजता काहीही कारण नसतांना गावातील गोपाल विठ्ठल पवार आणि राजश्री गोपाल पवार यांनी ढालगाव ते ढालशिंगी रस्त्यावर सागरची गाडी आडविली. गाडीतील वृध्द आजी यांना लाठीकाठ्ठयांनी बेदम मारहाण केली. प्रतिकार करण्यासाठी सागर पवार याने मध्यस्थी केली असता त्याला चाकूचा धाक दाखवून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर तरूणाने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून दुपारी अडीच वाजता संशयित आरोपी गोपाल विठ्ठल पवार आणि राजश्री गोपाल पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हंसराज मोरे करीत आहे.

Protected Content