पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर येथून जवळच असलेल्या -सोनाळा शिवरस्त्यावर मंगळवारी शिंगायत येथील तरुणाच्या निर्घृण खून करणाऱ्या अटकेतील संशयित आरोपीला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दारूच्या नशेत मंगळवार २१ मार्च रोजी शिंगायत येथील प्रमोद उर्फ बाळू भगवान वाघ (वय- ३७) याची दगडाने ठेचून निर्घूणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासात शिंगायत येथील रविंद्र उर्फ बाळू भगवान हडप (वय-४१) यांस शिंगायत येथून ताब्यात घेऊन पहूर पोलिसांच्या ताब्यात दिले होते. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपला गुरूवारी २३ मार्च रोजी त्यास जामनेर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यास २६ मार्च पर्यंत ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.