ट्रक-कारचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील स्टार फॅक्टरी पासून काही अंतरावर असलेल्या वाडी गावानजीक इंडिका कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील स्टार फॅक्टरी पासून जवळ असलेल्या वाडी गावानजीक भरधाव वेगाने येणारे कार आणि ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात गुरूवारी २२ जून  रोजी दुपारी १ वाजता झाला आहे. या भीषण अपघातात ट्रकने कारला फरफटरने नेले. यात कार चालका मनोज बळीराम वाघ रा. लिहा ता. मोताळा जि.जळगाव याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे.  अपघात इतका भीषण होता की कारचा पत्रा कापून चालकाचा मृतदेह बाहेर काढावा लागला. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक याला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच जामनेर व बोदवड पोलीस घटनास्थळी येऊन मृतदेह जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे.

Protected Content