जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणावर धारदार वस्तूने वार

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील वाकीरोडवर राहणाऱ्या एका तरुणाला जुन्या भांडणाच्या कारणावरून ४ जणांनी बेदम मारहाण करत धारदार वस्तूने छातीवर वार करून गंभीर दुखापत केल्याची  घटना घडली आहे. या संदर्भात जामनेर पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, योगेश श्रावण सोनार (वय-२५) रा. बालाजी पार्क, वाकी रोड, जामनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून चायनीज गाडी लावून आपला उदरनिर्वाह करतो. योगेश सोनारचा भाऊ कृष्णा याने जुन्या भांडणाच्या कारणावरून सुमित शास्त्री याच्या विरोधात तक्रार दिली होती.  ती तक्रार मागे घ्यावी अशी मागणी योगेश सोनारकडे केली होती. याचा रागातून कृष्णा शास्त्री याचा भाऊ रवींद्र किशोर शास्त्री, दादाराव जोशी, विशाल राम भैय्या आणि स्वप्निल जोशी या चार जणांनी १० मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास योगेश सोनार याचा रस्ता अडविला. व पोलिसात केलेले तक्रार ही मागे घ्यावी, अशी मागणी केली. यावरून वाद निर्माण झाला. रवींद्र शास्त्री याने धारदार वस्तूने योगेश सोनार यांच्या छातीवर वार केले. यात योगेश हा जंभीर जखमी झाला तसेच मारहाण सुरू असताना उषाबाई श्रावण सोनार या भांडण सोडवण्यासाठी आला असता, त्यांना देखील धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. तसेच योगेश याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर गुरुवार ११ मे रोजी रात्री उशिरा योगेश सोनार यांनी दिलेल्या पिऱ्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जयंत पगारे करीत आहे.

Protected Content