जामनेर तालुक्यातील एका तरूणीचा विनयभंग व जीवेठार मारण्याची धमकी;

जामनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १९ वर्षीय तरूणीचा  विनयभंग करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी ६ मे रोजी दुपारी ३ वाजता पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती असे की, जामनेर तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ५ मे रोजी सायंकाळी तरूणी ही घरी असतांना गावात राहणारा ज्ञानेश्वर अनिल चव्हाण याने तरूणीचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच विरोध केल्यावेर संशयित आरोपी ज्ञानेश्वर चव्हाण याने तरूणीला शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत तरूणीने पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी ज्ञानेश्वर अनिल चव्हाण याच्या विरोधात पहूर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रशांत विरणारे करीत आहे.

Protected Content